अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे : भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी सायन्स केले . बी एड , एम एड शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले . एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाला बहर येत गेला ! कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृत...
Posts
Showing posts from November, 2018